रावेर येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद

0

रावेर । भारत सरकार खेल व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र तसेच भिमालय बहुउद्देशीय संस्था रावेर यांच्या वतीने स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रावेर येथे नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक अतुल निकम व सुनील पंजे यांच्या मार्गदर्शनांतर्गत कबड्डी स्पर्धा पार पडली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद शाळेचे चेअरमन रवींद्र पवार होते. तसेच भिमालाय संस्थेचे अध्यक्ष मेघराज शेगावकार, पंचाची भूमिका श्रीकांत महाजन, युवराज महाजन, किरण महाजन यांनी पार पाडली.

आठ संघात सामने
कबड्डी स्पर्धेची विनर टीम स्वामी क्लब ही ठरली तर रनर टीम जय माता दी ही होती. स्पर्धेला एकूण आठ संघांनी समावेश नोंदवला. सूत्रसंचालन जयंत बिरपन यांनी केले तर आभार स्वामी शाळेचे क्रीडा शिक्षक श्रीकांत महाजन यांनी मांडला. भिमालाय संस्थेचे व नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक, वसीम कुरेशी, आकाश मेढे, कुणाल मेढे, विशाल दामोदरे, निशाण म्हसाने, रोहित गजरे, राहुल गजरे यांनी परिश्रम घेतले.