रिपाइं महिला आघाडीतर्फे माता रमाबाईंना अभिवादन

0

जळगाव । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महिला आघाडीच्यावतीने शांतीनारायण नगर येथील महिला आघाडीच्या संपर्क कार्यालयात माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच महाराणा प्रताप यांच्या स्मृतिस अभिवादन करण्यात आले. रमाबाई आंबेडकर, क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभिजीत पाटील, जहगाव तालुका अध्यक्ष रमाताई ढिवरे यांनी पुष्पहार अर्पण केले. मोना राजपूत यांनी महाराणा प्रताप व माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवन कार्याबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नितीन अस्मार, महानगर कार्याध्यक्ष सागर सपकाळे, लता वाघ, सुरेखा बेडसे, शोभा खैरनार, रेखा जाधव, सुलोचना माळी, पुजा कोळी, अनिता पाटील, कल्पना राजपूत, निलीमा वरणकर, सागर पवार, ईश्‍वर चंद्रे, शेखर चितळे, निलेश महाजन, अभिजीत भावसार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिता वाघ यांनी केले. तर आभार कविता सोनवणे यांनी मानले.