Private Advt

60 हजारांचा अ‍ॅल्युमिनियम तार चोरट्यांनी लांबवला

अमळनेर : सडावण शिवारातून डीटीसीवरील एल.टी.लाईनवरील सुमारे 60 हजारांचे साहित्य चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी अमळनेर ग्रामीणचे सहा. अभियंता विजय माधवराव माकी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय विदयुत अधिनियम सुधारणा कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलिसात गुन्हा दाखल
सोमवार, 18 फेब्रुवारी 2022 रोजी सडावण शिवार येथील डि.टी.सी.वरील एल.टी.लाईन साहित्य चोरीस गेल्याची माहिती उघड झाल्यानंत वरीष्ठ तंत्रज्ञ, अविनाश अशोक रणदिवे यांना फोनवरुन माहिती दिल्यानंतर सहा.अभियंता विजय माधवराव माकी हे सहकारी कर्मचारी प्रवीण प्रल्हाद पाटील (प्रधान तंत्रज्ञ) यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. सडावण शिवार व सुंदरपट्टी शिवारातील डि.टी.सी.क्र. लिलाबाई भिल यांच्या शेतातील 21 हजार 722 रुपये किंमतीचा तर महादु दगडु सोनार यांच्या शेतातून आठ हजार 355 व अनंत नथ्थू पाटील यांच्या शेताच्या बांधावरील 30 हजार 77 रुपयांचा मिळून एकूण 60 हजार 154 रुपयांचा एक लघुदाब वाहिनीच्या दुसर्‍या पोलपासून बी-फेजचा अ‍ॅल्युमिनियमचा तार (एल.टी.लाईन साहित्य) चोरट्यांनी लांबवले.