साहित्यापेक्षा राजकारण मोठे

0

डोंबिवली (श्रुती देशपांडे,):  संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी मंडळी नको असा साहित्यिकांचे म्हणणे असते. तरी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीपासुन ते समारोपापर्यत सर्वच राजकीय व राष्ट्रीय नेत्यांनी पाठच फिरवली आहे. शरद पवार, उध्दव ठाकरे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे अशआ अनेकांनी संमेसनाकडे पाठ फिरवली. एकिकडे आयोजकांचा राजकारणी मंडळी या व्यासपीठावर आणण्याचा अट्टाहास असतो. अर्थात त्या मागे अर्थकारण असते. त्याशिवाय पर्यायही नाही. बरं असे जरी असले तरी राजकारणापुढे या साहित्याला मात्र दुय्यम स्थानच हे नेते देत असल्याचेच चित्र या संमेलनाच्या निमित्ताने समोर आले आहे.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या सुरवातीपासुनच राजकारण प्रचंड रंगत होत. आचारसंहिता, निवडणूक सभा अशी अनेक कारणे पुढे करत ते साहित्य संमेलनाच्या उदघाटनला उदघाटक म्हणुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावणे यामागेही 27 गावांची स्वतंत्र महापालिका करावी ही मागणी पूर्ण करावे यासाठी यांना बोलावण्याचा घाट केला असल्याची र्चचा होती. तर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना बोलवणे ठरवले नव्हते. मात्र मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी अकरा लाखांचा धनादेश देण्यात आला .त्यामुळे ठाकरे यांना कुठे बोलवावे यासाठी त्यांना ग्रंथ दिंडी प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन बोलविण्याचे ठरविले होते. त्यासाठी शहरभर स्वागताचे बॅनर लावले होते. मात्र ऐनवेळी उल्हासनगर मध्ये सभा असल्याचे कारण पुढे करत त्यांनीही दांडी मारली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार यांचे नाव कार्यक्रमपत्रिकेत मुख्यमंत्रयांच्या नंतर नाव छापण्यात आले त्यामुळे ते ही रागवले आणि साहित्याच्या प्रांगणात आम्ही काय करणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली म्हणुन त्यांचीही गैरहजर होते. मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणूक अर्ज दाखल प्रक्रिया आणि जाहीर सभा यांचे कारण पुढे करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेही यांनीही संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी दांडी मारली.