हरिपुरा येथे स्काऊट शिबीर संपन्न

0

भुसावळ। महाराणा प्रताप महाविद्यालयाचे दोनदिवसीय निवासी स्काऊट शिबीर यावल तालुक्यातील हरिपुरा येथील गोविज्ञान अनुसंधान बहुउद्देशीय संस्थेत पार पडले. यात विद्यार्थ्यांनी तेथील गोशाळा, शेणापासून वीज निर्मिती, गांडूळखत प्रकल्प तसेच हरिपुरा धरणाला भेट दिली.

प्रा. शाम दुसाने यांनी वृक्षसंवर्धनाची आवश्यकता, विद्यार्थ्यांसमोर मांडली. शेकोटी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त गुण सादर केले. शिबिराच्या समारोपात बापू मांडे यांनी आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात कधीच अश्रू येवू देवू नका, असे आवाहन केले. यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.