फरार आरोपीकडून गावठी पिस्तुल हस्तगत

0

भुसावळ । येथील तालुका पोलीस स्थानकात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीस फैजपूर पोलीसांनी अटक करुन भुसावळ तालुका पोलीसांच्या स्वाधीन केले असता शिंदी येथील आरोपीच्या घराची झडती घेवून बुधवार 1 रोजी पोलीसांनी गावठी पिस्तुल हस्तगत केले. तालुक्यातील शिंदी येथील मुकेश प्रकाश भालेराव यांच्यावर तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हा 16 डिसेंबर 2016 पासून फरार होता.

यांनी केली कारवाई
त्याला फैजपूर पोलीसांनी 31 रोजी ताब्यात घेवून भुसावळ तालुका पोलीस स्थानकात हजर केले. पोलीसांनी शिंदी येथील भालेराव यांच्या घराची झडती घेतली असून त्याच्याकडून 25 हजार रुपयांचे गावठी पिस्तुल हस्तगत केले. याअगोदर दोन गावठी पिस्तुल जप्त केली होती. सहाय्यक पोलीस अधिक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक बाळासाहे गायधनी, उपनिरीक्षक सचिन खामगळ, सहाय्यक फौजदार सुरेश वैद्य, फारुख शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनिल चौधरी, पोलीस नाईक जगन्नाथ शिंदे यांनी कारवाई केली.