ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगिता पाटील यांची उमेदवारी

0

यावल। पंचायत समिती हे तालुक्यातील ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून संबोधले जाते. त्यामुळे आपल्या गणाचा व पर्यायाने गावाचा विकास साधण्यासाठी पंचायत समितीला महत्वाचे स्थान आहे. पंचायत समितीच्या माध्यमातूनच आपल्या गावाचा व परिसरातील भागाच्या विकासाच्या विविध योजना राबविल्या जातात त्यामुळे विकास हेच उद्दीष्ठ समोर ठेवून तालुक्यातील दहीगाव गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून योगिता देवकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्या तालुक्यातील विरवली येथील रहिवासी असून राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष देवकांत पाटील यांच्या त्या पत्नी आहेत.

तालुक्यात राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवार
यावेळी देवकांत पाटील यांचे ग्रामीण भागात समाजपयोगी कार्य चांगले आहे. त्यामुळे लोकांची त्यांच्याप्रती असलेला जिव्हाळा व सलोख्याचे संबंध लक्षात घेता नागरिकांच्या आग्रहास्तव त्यांनी आपली पत्नी योगिता पाटील यांना निवडणूकीच्या रिंगणात उभे केले. योगिता पाटील यांचे शिक्षण यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कला शाखेतून शेवटच्या वर्षाला पदवीचे शिक्षण घेत आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून तालुक्यात त्या एकमेव उमेदवार रिंगणात आहे. अजर्र् भरतांना योगिता पाटील यांच्या सोबत देवकांत पाटील, तालुका अध्यक्ष मुकेश येवले, माजी पंचायत समिती सदस्य अरुण आबा, दिनकर पाटील, एम.बी.तडवी, नरेंद्र पाटील, भागवत अटवाल, दीपक पाटील, हितेश गजरे, गोलू माळी, दीपक येवले, भिकन मराठे, विनोद पाटील, अरुण पाटील, मयूर पाटील, द्वारका पाटील, अनिल कोळी, देवेंद्र पाटील आदी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज सादर केला. योगिता आणि देवकांत यांनी आपण समाजाचे देणे लाभतो हा हेतू समोर ठेवून आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यांनी आपल्या विवाहाच्या दिवशीच नेत्रदानाचा संकल्प केला होता. एक सुशिक्षित उमेदवार असून कोणताही राजकीय वारसा नसताना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली असून सर्वच त्यांच्याच नावाची चर्चा आहे.