50 वर्षीय शेतमजुराने शेतातच संपवले जीवन

यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा येथील शेत-शिवारात एका 50 वर्षीय शेतमजुराने निंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेवी आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही उघडकीस आली. गुलाब शंकर बारेला (50) असे मयताचे नाव आहे. डोंगरकठोरा डॉ.राजेंद्रकुमार चुडामण झांबरे यांच्याशेतात गुलाब शंकर बारेला (50, रा.गाडग्या आंबा, जि.खरगोन मध्यप्रदेश) हा कामास होता व डॉ.झांबरे यांचे खळ्यात वास्तव्यास होता. रविवारी सकाळी तो व त्याची पत्नी दोघे डोंगरकठोरा शिवारातील शेत गट नं. 305 मध्ये कामाला गेले होते मात्र शेतबांधावर असलेल्या निंबाच्या झाडाच्या फांदीस दोरीने बांधून गुलाब बारेला याने गळफास घेतल्याचे उघडकीस येताच खळबळ उडाली. यावल पोलिसात पोलिस पाटील राजरत्न अढाळे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. डॉ.अक्षय लाडगे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. तपास हवालदार अशोक जवरे करीत आहेत.