50 कोटी रुपयांवरील एलबीटी 1 एप्रिलपासून रद्द करणार

0

पुणे : 1 एप्रिलनंतर 50 कोटी रुपयांवरील एलबीटी रद्द करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. पुण्यातील व्यापारी मेळाव्यात अर्थमंत्री बोलत होते. तसेच राज्यात दुष्काळाच्या काळातही विकासदर वाढल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वजन कमी करण्यासाठी व्यायाम किंवा जेवण कमी करु नका, तर फक्त एखादा व्यापार टाका, वजन आपोआप कमी होईल, असेही पुण्यातील व्यापारी मेळाव्यात अर्थमंत्र्यांनी सांगितले. मागच्या वर्षी राज्यात मोठा दुष्काळ होऊनही राज्याचा विकासदर 5 वरुन 8 वर नेण्यात राज्य सरकारला यश आल्याचा दावाही मुनगंटीवारांनी केला. आमचे सरकार सर्वसामान्यांसोबत आहे, तसेच व्यापार्‍यांचे प्रश्न सोडवण्यास प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.