मोठा वाघोदा येथे आगीत 5 टपऱ्या जळून खाक l लाखोंचे नुकसान

सावदा (प्रतिनिधी) – येथून जवळच असलेल्या मोठा वाघोदा येथे बस स्थानका जवळील पाच टपऱ्याना दि 23 रोजी मध्यरात्री अचानक आग लागून आगीत जळून या टपऱ्या व त्यातील साहित्य जळून खाक झाले

बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील मोठे वाघोदे येथील बस स्थानक जवळ महामार्ग वरील टपऱ्या दिनांक 23 रात्री ते दि 24 रोजी रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास आग अचानक आग लागल्याने येथील विजय नथू चौधरी यांच्या मालकीचे बासुरी पान सेंटर मधील झेरॉक्स मशीन लॅपटॉप स्टेशनरी व इतर साहित्य असे अंदाजे दोन लाख रुपयांचे टपरीसह साहित्य जळून खाक झाले तर गुलशन समशेर पठाण यांचे सुमारे दीड लाख रुपयाचे टपरीसह साहित्य जळून खाक झाले तर मलक इमाम मलक स रवर यांच्या सायकलीच्या साहित्या सह टपरीसह चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले मधुकर भिकाजी निंबाळकर यांची सलून चे टपरी आगीत जळून भस्म सात झाली ईलाईस खान ईस्मालखान याचे मोटार सायकल गॅरेज या आगीत भस्मसात झाल्या

आग विझवण्यासाठी सावदा येथील नगरपालिका अग्निशामकाचे बंब बोलवण्यात आले होते तसेच घटनेची माहिती मिळतात सावदा पोलिसांनी घटने ठिकाणी धाव घेतली आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही उदारनिर्वाहाचे साधन आगीत भस्मसात झाल्याने गरीब टपरी चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासकीय मदत देण्यात यावी अशी अपेक्षा टपरी धारक करीत आहे