कोळसा घोटाळयाप्रकरणी ५ जण दोषी !

0

नवी दिल्ली-कोळसा घोटाळ्या प्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालयाने पाच जणांना दोषी ठरवले आहे. पश्चिम बंगालमधील मोयरा आणि मधुजोरमधील कोळसा खाणवाटपप्रकरणातील घोटाळ्यासाठी त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच.सी गुप्तांसह विकास मेटल पॉवर लिमिटेड या कंपनीच्या चार जणांचा यात समावेश आहे.

आघाडी सरकारच्या काळात मोयरा आणि मधुजोरमधील कोळसा खाणवाटपात घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालयात सुनावणी सुरु होती. आज कोर्टाने या प्रकरणात निकाल दिला आहे.

Copy