Private Advt

49 वर्षीय प्रौढाची जळगावात आत्महत्या

जळगाव : शहरातील चौघुले प्लॉट येथे राहणार्‍या 49 वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अशोक यशवंत शिंदे (49, चौघुले प्लॉट, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
अशोक शिंदे हे पत्नी व मुलासह चौघुले प्लॉट परीसरात वास्तव्यास असून कोल्हापुरी मशिनरी दुकानात नोकरीला होते. रविवारी ते घरीच होते. दुपारी 12 वाजता त्यांची पत्नी छाया या मुलगा राहुलसोबत टॉवर चौकातील जैन मंदीरात आल्या असता शिंदे यांनी री कुणीही नसतांना त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. दुपारी चार वाजता मुलगा राहुल आणि पत्नी छाया या घरी आल्या हा प्रकार उघडकीस आला. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.