पाचोरा शिवसेना कार्यालयात महापुरूषांना अभिवादन

0

पाचोरा । पाचोरा येथील शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयात शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व आझाद हिंद सेनेचे प्रमुख व भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जय हिंद आणि चलो दिल्ली अशी गर्जना करून अन्याय ब्रिटीश सत्तेला खंबीर आव्हान देणार्‍या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. माजी आमदार आर.ओ. पाटील व आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम झाला. छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमांचे पुजन करून या विभुतींना नम्रपुर्वक अभिवादन करण्यात आले.

अभिवादन प्रसंगी यांची उपस्थिती
या प्रसंगी अ‍ॅड. दिनकर देवरे, दिपकसिंग राजपूत, किशोर बारवकर, नगराध्यक्ष संजय गोहिल, पद्मसिंग पाटील, पप्पु राजपूत, चंदु केसवाणी, दत्ता जडे, गंगाराम पाटील, अशोक वस्ताद, सुधाकर महाजन, अशोक निंबाळकर, संदीपराजे पाटील, अनिकेत सुर्यवंशी, अनिलआबा येवले, प्रविण वाघ, जितेंद्र पेंढारकर, समाधान पाटील, वैभव राजपूत, फईम शेख, जावेद शेख, प्रतिक पाटील, भूषण दत्तु, विजय भोई, दिपक पाटील आदि शिवसेना व युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.