जळगाव पीपल्स बँकेतर्फे चित्रकला स्पर्धा

0

जळगाव । शहरातील दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेतर्फे दरवर्षी चित्रकला स्पर्धा घेण्यात येते. या वर्षी देखील रविवार 22 रोजी बहिणाबाई उद्यानात विद्यार्थ्यासाठी खुली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. सदरील चित्रकला स्पर्धा बँकेचे अमृतमहोत्सवी (75) व्या वर्षापासून म्हणजेच 2008 यावर्षा पासून आयोजित करण्यात येत आहे. हे स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. प्रमुख अतिथी डॉ.प्रदीप पाटील, प्राचार्य वैजयंती तळेले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेस पाच हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला

ज्वलंत विषयावर रेखाटली चित्रे
बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील यांनी प्रास्ताविकात जळगाव पीपल्स बँक विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेल्या कार्यक्रमांबद्दल सांगीतले. बँकींग क्षेत्रात अर्थकारण करीत असतांना बँक कला, समाज, संस्कृती या विविध क्षेत्रातही आपला सहभाग नोंदवीत असते. विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी चित्रकला हे अतिशय प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. प्रमुख अतिथींनी चित्रकला स्पर्धा उपक्रमाबद्दल कौतुक केले. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे चार गट करण्यात आले होते. फुलपाखरु, स्वच्छ भारत अभियान, एटीएम मशीनजवळ आई, वडीलांसोबत मुल, कॅशलेस व्यवहार करतांना (मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, कार्ड स्वाईप करतांना असे विषय चित्रकला स्पर्धेसाठी देण्यात आले होते. प्रथम पारितोषिक 1001, व्दितीय पारितोषिक 751, तृतीय पारितोषिक 501, उत्तेजनार्थ पाच पारितोषिक,प्रशस्तीपत्रक, स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहेत सूत्रसंचालन गायत्री जोशी यांनी केले. यावेळी जान्हवी पाटील, सुरेखा चौधरी, अनिकेत पाटील, दिलीप देशमुख, डॉ.सी.बी.चौधरी आदी उपस्थित होते.