बोर्ड परिक्षेत विद्यार्थ्यांना 25 गुण द्यावे

0

जळगाव । वर्ग 8 ते 10 मध्ये शिक्षण घेणार्‍या आणि किर्तन, भजन, भारुड, शास्त्रीय गायन, मृंदगवादन या भारतीय लोककला प्रकारात सहभाग घेणार्‍या विद्यार्थ्याना 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परिक्षेत अतिरिक्त 25 गुण देण्यात यावे अशी मागणी सदगुरु झेंडुजी महाराज बेळीकर किर्तनकार संस्थेचे अध्यक्ष मठाधिपती ह.भ.प. राजाराम शास्त्री महाराज यांच्यासह किर्तनकारांनी केली आहे. मागणीचे निवेदन त्यांनी शालेय शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना दिले आहे.

लोककला जीवंत ठेवण्यासाठी घेतला पुढाकार
शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालयाने विद्यार्थ्याच्या कला गुणांना वाव देण्यासाठी चांगले पाऊले उचलावी, जेणे करुन लोककला प्रकार जीवत राहील. विद्यार्थ्याचा सहभाग असलेल्या लोककला प्रकारासंबंधी धर्मदाय संस्थेकडे तीन वर्षापासून नोंदणीकृत असण्याचे निकष लावावे अशीही मागणी केली आहे. मठाधिपती ह.भ.प. भरत महाराज पाटील , गोपाळ महाराज ढाके, भगवान महाराज, अ‍ॅड. राधिका ढाके, प्रकाश महाराज जंजाळ ,नरहरी महाराज , सुरेश महाराज गाडेकर, तुळशीराम महाराज पाटील, सुधाकर महाराज, जंगले बेलव्हाय, उध्दव महाराज दहिगावकर, सुकदेव महाराज राणे, संजय महाराज सुसरीकर यांनी निवेदनावर सही केली आहे. मुख्यमंत्री शालेय शिक्षण व क्रिडा मंत्रालय मुंबई व सांस्कृतीक कार्य संचनालय पुणे यांना निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे.