भरारी फाऊंडेशनतर्फे 11 फेब्रुवारीपासून जळगावात ‘बहीणाबाई महोत्सव’

0

जळगाव । खान्देशाच्या सांस्कृतीक चळवळीला बळ देणारा व बचत गटाच्या महिलांना अर्थिक विकासाच्या दुष्टीने महत्वपुर्ण ठरलेला बहिणाबाई महोत्सव 2017 या तिसर्‍या वर्षाचे आयोजन 11 फेब्रुवारी ते 15 फेबु्रवारी 2017 रोजी सागरपार्क या ठिकाणी भरारी फाऊंडेशनच्या वतीने आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे सिने अभिनेत्री केतकी मोटेगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शनाने या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी विविध शालेय विद्यार्थी महाविद्यालयानी विद्यार्थी, विविध महिला मंडळ, सामाजिक संस्था उपस्थित राहणार आहे. तसेच सोहळ्याप्रसंगी महिला ढोल पथक, शालेय विद्यार्थ्यांचे लेझीम पथक तसेच विविध वाद्य प्रकाराने या महोत्सवाचे शुभारंभ होणार असल्याची माहिती पत्रकार परीषदेत भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दिपक परदेशी यांनी दिली.

महिला बचत गटांचा महत्वपुर्ण सहभाग
महिला बचत गटाने निर्माण केलेल्या वस्तूंना हक्काच व्यासपीठ निर्माण व्हाव त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंना योग्य ती किंमत मिळावी व त्यातून आर्थिक उन्नती व विकास व्हावा हा मुळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला बचत गटांचा वाढता प्रतिसाद पाहता या महोत्सवात जळगावसह 200 गट खान्देश बाहेरील नामवंत अशी 20 महिला बचत गट अशी 220 बचत गटांना नामपत्र दरात या महोत्सवात स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचीही माहिती बाळासाहेब सुर्यवंशी, रितेश लिमजा, गोपाळे कापडणे, मुग्धा कुलकर्णी, नेहा बोरसे, चाणक्य जोशी, अमेश जोशी, सचिन बोरसे, रोशन गांधी आदींची उपस्थिती होती.

बहीणाबाई पुरस्कार व स्त्री शक्ती सन्मान
सामाजिक, सांस्कृती, शैक्षणिक व महिला विकासाच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या व्यक्तींना दरवर्षी बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. खान्देशासह राज्यभरात विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या दहा व्यक्तींना बहीणाबाई पुरस्काराने सत्कार करण्यात येत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात महिला विकासाच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या विविध सामाजिक संस्था महिला मंडळे शैक्षणिक संस्था यांचा बहिणाबाई स्त्री शक्ती सन्मान देवून गौरव करण्यात येणार आहे. दरम्यान या महोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच या स्पर्धेचे आयोजन केल्यानंतर भव्य अशी रांगोळी स्पर्धेचे आयोजन 28 जानेवारी रोजी सागरपार्क येथे करण्यात आले आहे. यावेळी महिलांनी मोठ्य संख्येन उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.