लोहारा- कुर्‍हाड गटात राजकिय हालचालींना आला वेग

0

वरखेडी । लोहारा-कुर्‍हाड जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छूक जिल्हा परीषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारांनी हल्ली संपर्क वाढविला असून यंदाच्या निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस (आय), शिवसेना स्वतंत्र उमेदवार देणार असल्याचे चित्र आहेत. शिवसेनेकडून जिल्ह्यात पहिल्याच यादीत लोहरा-कुर्‍हाड गटाच्या उमेदवार म्हणून माजी महिला व बालकल्याण सभापती रेखा दिपकसिंग राजपूत यांना उमेदवारी मिळाली असून या जिल्हा परीषद गटात खूपच चुरस निर्माण होणार आहे. लोहारा-कुर्‍हाड गटात शिवसेना व भाजपाचे वर्चस्व असेल तरी मागील निवडणूक काँग्रेसचे उमेदवार शांताराम सोनजी पाटील निवडून आले होते. त्यांना विजयी होण्यात जनक्रांतीचे उमेदवारास मिळालेली मते महत्वाची ठरली होती. यावेळी लोहरा-कुर्‍हाड हा जिल्हापरिषद गट सर्व साधरण महिलासाठी राखीव झाल्याने सर्वच पक्ष उमेदवारांच्या शोधात असून विद्यमान जि.प. सदस्य शांताराम पाटील यांच्या सून, वसार्वेचे सरपंच संजय शांताराम पाटील यांच्या पत्नी अनिता पाटील तर कळमसरा येथील समाधान पांडुरंग पाटील यांच्या पत्नी या भाजपाकडून इच्छुक उमेदवार आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस (आय) कडून पाचोरा पं.स.चे माजी सभापती इस्माइल हजी फकीरा यांच्या सून कौसरबी युसुफ, संजय बारकू चौधरी यांच्या पत्नी, अशोक चौधरी यांच्या पत्नी आणि सुरेश गरबड चौधरी यांच्या पत्नी या जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक उमेदवार असून लोहरा -कुर्‍हाड गेल्यावेळी प्रमाणे काँग्रेस आघाडी यशस्वी होते, कि पूर्वी प्रमाणेच भाजप, सेनाचा बाले किला होते की नाही हे या होणार्‍या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.

दोन्ही गणात आरक्षणाच्या माध्यमातून हे आहेत इच्छूक
लोहरा पंचायत गण हा ओबीसी महिलाराखीव असून भाजपाकडून जुने पक्षाशी एकनिष्ठ व जनतेच्या कामासाठी वेळोवेळी झटणारे जेष्ठ भाजपा कार्यकर्ते शरद आण्णा सोनार यांच्या पत्नी, माजी उपसभापती पं.स. पाचोरा वर्षा शरद सोनार, सीमा चंद्रकात पाटील, अनिता कैलास चौधरी, सविता संजय उशीर, वर्षा विनोद चौधरी आशा पाच इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली आहे. तर शिवसेनेकडून विद्यमान उपसभापती यांच्या पत्नी, दिनकर गीते यांच्या पत्नी, शामराव बागुल यांच्या पत्नी, माळी समाजचे अध्यक्ष विठ्ठल माळी यांच्या पत्नी, मुस्लीम समाजाचे कार्यकर्ते हसन कुरेशी यांच्या पत्नी, विद्यमान ग्रा.पं.सदस्या मरियमबी शेख हसन हे सर्व शिवसेनेकडून इच्छुक असून राष्ट्रवादी व कॉग्रेस (आय) आघाडीकडून सुरेश गरबड चौधरी यांच्या पत्नी रंजना चौधरी, इश्वर आनंदा देशमुख यांच्या पत्नी, गुणवत सुभाष चौधरी यांच्या पत्नी या इच्छुक आहे.

लोहरा-कुर्‍हाड जिल्हा पंचायत गटातील कुर्‍हाड पंचायत समिती गण जनरल(ओपन) असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या संभव्य उमेदवारीची भाऊगर्दी असून पाचोरा पंचायत समतीचे सभापतीपद हे जनरल असल्याने अपक्ष उमेदवारांची उमेदवारी या गणातून होऊ शकते. शिवसेनेकडून भोकरी विकास सोसाचे चेअरमन व उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर सोनार, कुर्‍हाडचे सरपंच अख्तार काकर, ग्रा.पं. सदस्य रामदास देशमुख, कौतिक पाटील, भोकरी ग्रा.प सदस्य डॉ. रशीद शब्बीर काकर, लासुरेचे माजी उपसरपंच भैय्यासाहेब देवरे हे इच्छुक उमेदवार आहेत तर भाजपाकडून माजी जि.प.सदस्य संतोष भिका चौधरी, जगदीश तेली, किरण पाटील, आबे वडगाव डॉ. विकास पाटील, भोकरी रफिक शब्बीर काकर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. राष्ट्रवादी व कॉग्रेस (आय) आघाडी कडूनमाजी सभपती इस्माईल हजी फकीरा शंकरआप्पा बोरसे कैलास भगत हे ईच्छुक उमेदवार आहे.

लोहारा कुर्‍हाड गटात यांचा समावेश
लोहारा । कुर्‍हाड गटातील लोहरा, कळमसरा, कासमपुरा, म्हसास, शाहपुरा, कुर्‍हाड तांडा, कुर्‍हाड बुद्रुक, कुर्‍हाड खुर्द, सांगवी, नाईकनगर, सासगाव, बिल्दी, सर्वे जमाने ही बहुसंख्य गावे हे जामनेर विधानसभेत समाविष्ट असून आंबे वडगाव, कोकडी, आंबेवडगाव तांडा, भोकरी, वरखेडी, लासुरे सावखेडा बुद्रुक हे सात गावे पाचोरा विधानसभा मतदारसंघात आहे. जि.प.गटातील सर्वात जास्त गावे जामनेर मतदार संघात असल्याने व विद्यमान जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या क्षेत्रात असल्याने या गटाला जास्त महत्व आले आहे. तर विद्यमान जिल्हा परीषद सदस्य शांताराम पाटील यांच्या सून भाजपाकडून उमेदवारी घेत असल्याने गेल्यावेळी प्रमाणे कॉग्रेस व राष्ट्रवादी यांची यावेळी जवळ जवळ आघाडी झाली असून गेल्या वेळीची विजयी सीट कायम राखण्यासाठी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांना प्रयत्न करावे लागणार आहे. लोहारा कुर्‍हाड जिल्हा परीषद व पंचायत समिती गणात उमेदवार निश्‍चित झाल्यावरती पुढील चित्र स्पष्ट होईल. आता या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
– रविशंकर पांडे
9403301084