गुजरातच्या माऱ्यापुढे शेष भारतचा डाव गडगडला

0

– पुजाराची एकाकी झुंज; चिंतन, हार्दिक यांचा प्रभावी मारा

मुंबई: इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत गुजरातच्या ३५८ धावांच्या प्रत्युत्तरात गुजरातचा डाव गडगडला असून दुसऱ्या दिवसाअखेर त्यांची अवस्था ९ बाद २०६ अशी झाली असून अद्याप १५२ धावांची पिछाडी आहे. शेष भारतकडून एकामागून एक फलंदाज बाद होत असताना चिरागने झुंजार नाबाद शतक झळकावत गुजरातने सर्वबाद ३५८ अशी मजबूत धावसंख्या उभारली. शेष भारताचा कर्णधार चेतेश्वर पुजारा (८६) वगळता एकाही फलंदाजाला तग धरता आली नाही.

अखिल हेरवाडकर (४८), करून नायर (२८), मनोज तिवारी (१२) वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. गुजरातकडून चिंतन गाजा, हार्दिक पटेल यांनी प्रभावी मारा करीत प्रत्येकी ३ गडी बाद केले तर मोहित थंदाणीने २ गडी बाद केले. गुजराते प्रियांक पांचाळ (३०) आणि कर्णधार पार्थिव पटेलसारखे (११) चांगल्या लयीत असलेले फलंदाज बाद ठरावीक फरकाने बाद झाल्यांनतर चिराग गांधीच्या खेळीच्या बळावर धावांचा डोंगर उभारला. त्याला मनप्रीत जुनैजाची (४७) चांगली साथ मिळाली. चिरागने १५९ चेंडूंत १८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १६९ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली, प्रथम श्रेणी सामन्यातील त्याचे हे पहिले शतक ठरले.