43 वर्षानंतर विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

0

भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात 1974 च्या अकरावीतील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

भुसावळ- आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वर्गमित्र, मैत्रिणी भेटणे दुर्मीळ झाले असून तब्बल 43 वर्षानंतर मात्र त्यांची भेट झाल्याचा दुर्लभ प्रसंग स्नेहमेळाव्यानिमित्त जुळून आला. शहरातील के.नारखेडे विद्यालयात 1974-75 मध्ये शिकणार्‍या अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला, त्यात जुन्या आठवणींना उजाळा देत मनमोकळा संवाद साधण्यात आला बहुतांश मित्र-मैत्रीण नोकरी, व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी वास्तव्यास असलेतरी या कार्यक्रमानिमित्त ते एकत्र जमले होते.

सेवानिवृत्त शिक्षकांचा केला सत्कार
मेळाव्यात तत्कालीन शिक्षक, कर्मचारी व माजी विद्यार्थी एकत्र आल्याने उत्साहाचे वातावरण होते. प्रसंगी विद्यार्थांनी सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचार्‍याां सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त केली. सत्कारार्थी माजी शिक्षक डी.व्ही.इंगळे, पुष्पा अडावदकर, एस.टी.कोल्हे, एम.एस.हडपे, ए.आर.गाजरे, माजी कर्मचारी काशीनाथ चौधरी, जगन पाटील यांनी मनोगतात अशाच प्रकारे वेळोवेळी एकत्र येऊन स्नेह बंधन दृढ करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी रघुवीर वाणी, विजय भारंबे, सुनील भारंबे, सुधीर पटवे, गिरीष वारकर, सुनील चौधरी, अनिल अग्रवाल, अरविंद सुतार, राजेंद्र पाटील, शेख मोहजबीन, वंदना घोलप, सुतेज चौधरी, भास्कर नारखेडे, शरद झोपे, गणेश इंगळे, ज्योतीबाला राजहंस, रेखा वाणी, दीपक अंबरखाते, विनायक सकळकर, सुधीर घोडके, शिवाजी पाटील, अशोक वारके, सीमा देशपांडे, रेखा चौधरी, सुभाष चौधरी, विनय देशपांडे, गीता होलकोटे, विजया कुलकर्णी, सतीष पांढारकर,राजेश मलुफ्टे, हेमंतकुमार अनुष्ठाते, संजय नेमाडे, आशा पाटील, सुनील दिक्षित, विवेक कुलकर्णी, प्रशांत फालक, दत्तात्रय शिंदे, राजेंद्र यावलकर, विजय भगत, प्रदीप देशमुख, दिलीप पाटील, अरुण चौधरी, प्रतिमा पुराणिक, नलिनी पाटील, रेखा चौधरी, निशा रावेरकर, निंबा वाघ, रमेश अत्तरदे, प्रेमचंद नारखेडे उपस्थित होते. प्रास्ताविक गणेश इंगळे यांनी तर आभार रघुवीर वाणी यांनी मानले.