43 रेल्वे गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल

0

मध्य रेल्वेची सेवा अद्यापही विस्कळीत; नियोजन कोलमडले

भुसावळ । टिटवाळ्याजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला झालेला अपघात व त्यानंतर मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे मध्य रेल्वेची सेवा गेल्या चार दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. 1 व 2 साठी तब्बल 43 प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. रेल्वे प्रवाशांना विस्कळीत सेवेमुळे प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत असून अद्याप काही दिवसांचा अवधी सेवा सुरळीत करण्यास लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रेल्वे गाड्या रद्द झाल्यामुळे रेल्वेलादेखील लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी फेरले गेले आहे.

1 रोजी रद्द झालेल्या गाड्या अशा : 17058 सिकंदराबाद-मुंबई, 17057 मुंबई-सिकंदराबाद, 12534 मुंबई-लखनौ, 12139 मुंबई-नागपूर, 11015 एलटीटी-गोरखपूर, 12859 मुंबई-हावडा, 12876 हावडा-मुंबई, 18030 शालिमार-एलटीटी, 18029 एलटीटी-शालिमार, 12810 हावडा-मुंबई मेल, 12809 मुंबई-हावडा मेल, 12321 हावडा-मुंबई, 12322 मुंबई-हावडा, 11094 वाराणसी-मुंबई, 11072 वाराणसी-एलटीटी, 11071 एलटीटी-वाराणसी, 12168 वाराणसी-एलटीटी, 11062 दरभंगा-एलटीटी, 15065 गोरखपूर-पनवेल, 11082 गोरखपूर-एलटीटी, 11058 अमृतसर-मुंबई, 11057 मुंबई-अमृतसर, 12138 फिरोजपूर-मुंबई, 12137 मुंबई-फिरोजपूर, 12137 मुंबई-फिरोजपूर, 12533 लखनौ-मुंबई, 12142 पटना-एलटीटी, 12141 एलटीटी-पटना.

2 रोजी रद्द होणार्‍या गाड्या अशा : 12201 एलटीटी-हावडा, 12139 मुंबई-नागपूर, 11015 एलटीटी-गोरखपूर, 12101 हावडा-एलटीटी, 18030 शालिमार-एलटीटी, 12810 हावडा-मुंबई मेल, 22885 एलटीटी-टाटा अंत्योदय, 11093 मुंबई-वाराणसी, 12168 वाराणसी-एलटीटी, 12167 एलटीटी-वाराणसी, 11062 दरभंगा-एलटीटी, 15066 पनवेल-गोरखपूर, 11057 मुंबई-अमृतसर, 22121 एलटीटी-लखनौ, 12812 हतिया-एलटीटी.

Copy