पालकमंत्र्यांना समांतर रस्तासाठी निवेदन

0

जळगाव । शहरातून जाणार्‍या राष्ट्र्रीय महामार्गालगत असलेल्या समांतर रस्ते विकतिस करावे व महामार्गाची साईडपट्ट्यासह दुरूस्ती करण्याची मागणी जळगाव शहर जिल्हा काँग्रेस पार्टीतर्फे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना शुक्रवार 20 जानेवारी रोजी निवेदन देवून करण्यात आली. याप्रसंगी , प्रदेश प्रतिनिधी नदीम काझा, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, सरचिटणीस काफील अहमेद शेख, अमजद पठाण आदी उपस्थित होते. यावेळी शहर समस्यांच्या गर्तेत अडकले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. काँग्रेसतर्फे याविरोधात शासन व प्रशासन यांना वारंवार निवेदन, आंदोलन देवून देखील कोणतीही कारवाई करण्यात आले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

हुडको, इतर संस्थांचे कर्जफेड
निवेदनात शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत समारंतर रस्ते तातडीने विकसित करावे. शहरातंर्गत जाणार्‍या महामार्गाची साईडपट्ट्यासह दुरूस्ती करावी. जेणेकरुन गेल्या हजारो अपघाती मृत्यूची टांगती तलवार दूर होईल. जळगाव महानगरपालिकेच्या 18 मार्केटमधील 2175 गाळ्याचा भाडेकराराचा प्रलंबित प्रश्‍न महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने सोडावावा. यासोबतच मनपावरील हुडको व इतर संस्थाच्या कर्जफेड प्रकरणात पुढाकार घेवून शहराचा नागरिकांना कराच्या बदलत्या त सुविधा मिळण्यासाठी मार्ग सुकर करावा अशी मागणी करण्यात आली.

कायदा, सुव्यवस्थाचा प्रश्‍न बनला बिकट
शहरातील प्रलंबित रेल्वे उड्डाणपुलांचे काम तातडीसे सुरू करुन पूर्ण करावे, शहरातील वाढलेल्या अवैध धंद्याचे प्रमाण, वाढलेली गुन्हेगारी, चोर्‍या यामुळे ढासळलेली विस्कटलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी बसविण्यासाठी संबंधित पोलिस प्रशासनाला जाब विचारुन कार्यवाही करुन शहरातील जनजीवन सुरक्षित करावे, सामान्य माणसाच्या आरोग्य व्यवस्थेच्या आत्मा असलेले जिल्हा सामान्य रूग्णालयातील रिक्तपदे, तज्ज्ञ डॉक्टर्स, विविध यंत्रसामुग्री सिटीस्कॅन आदींची पुर्तता करुन गोरगरीबांना दिलासा द्यावा, असे निवेदन देण्यात आले. आम्ही भिकेची झोळी घेवून जनतेसमोर जावून जनसहभागातून या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु. आपण योग्य ती दखल न घेतल्यास आंदोलनाचा हक्क आम्ही बजावल्या शिवाय राहणार नाही स्पष्ट केले.

बियरबार बंद करण्याची मागणी
पालकमंत्री यांनी आज नागरिकांची भेट घेतली. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या यात मंडल क्र. 6 प्रभाग क्र.28 मधील शास्त्रीनगर येथील बियरबार बंद करण्या करीता आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
त्या प्रसंगी मंडल अध्यक्ष जीवन अत्तरदे ,नगरसेवका उज्ज्वला बेंडाळे, वंदना पाटील, रेखा पाटील, बापू कूमावत, किशोर चौधरी, जयंत राणे, राजू सदावर्त आदी उपस्थित होते. यासोबतच इतर संघटनांनी पालकमंत्र्यांनी भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.