भाजपाकडून निवडणूकीसाठी समितीची नेमणूक

0

जळगाव । जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय संबोधले जात असल्याने आणि भाजपा हा केंद्रासह राज्यात नंबर एकचा पक्ष असल्याने जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. ही निवडणूक जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार आहे. निवडणूकीत एकहाती सत्ता मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे सुक्ष्म व्युवरचना तयार करण्यात आली असून निवडणूकीसाठी संचालन समिती तयार करण्यात आली असल्याने त्यांचेवर जबाबदारी देण्यात आल्या आहे.

जिल्ह्यातील समिती खालील प्रमाणे
भुसावळ- आमदार संजय सावकारे, प्रा.डॉ.सुनिल नेवे, रावेर- हरिभाऊ जावळे,सुरेश धनके व जिल्हा बँकेच्या अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, यावल-आमदार हरिभाऊ जावळे, हर्षल पाटील, मुक्ताईनगर- आमदार एकनाथराव खडसे, प्रा.डॉ.सुनिल नेवे, निवृत्ती पाटील, जामनेर-गिरीश महाजन, तुकाराम निकम, गोविंद अग्रवाल, बोदवड- आमदार एकनाथराव खडसे, प्रा.डॉ.सुनिल नेवे, जळगाव-राजुमामा भोळे, प्रभाकर पवार, पारोळा,एरंडोल-ए.टी.पाटील, सुरेंद्र बोहरा व महेश पाटील,एस.आर.पाटील, पाचोरा,भडगाव,चाळीसगाव-आमदार उन्मेश पाटील, सदाशिव पाटील, पोपट भोळे, अमळनेर-आमदार स्मिता वाघ,अ‍ॅड.व्ही.आर.पाटील, चोपडा-खासदार रखा खडसे,प्रदीप पाटील. यांच्यासमवेत प्रचार-प्रसिध्दीसाठी सुनिल नेवे, कार्यालयीन व्यवस्थेसाठी गणेश माळी, सोशल मिडीयासाठी अमित चौधरी, सचिन नवगाळे,आचार संहिता प्रमुख अ‍ॅड.सत्यजित पाटील, जाहिरनामा प्रमुख महेश पाटील, समन्वयक- गोविंद अग्रवाल, शिरीष बायस यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे पदसिध्द पदाधिकारी म्हणून नामदार चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, आमदार एकनाथराव खडसे, अ‍ॅड.किशोर काळकर काम पाहणार आहे.