42 वर्षीय प्रौढाची आत्महत्या : शिरसोली गावातील घटना

जळगाव : जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील 42 वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी उघडकीला आली. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होवू शकलेले नाही. रघुनाथ रामदास अस्वार (42, रा.शिरसोली, ता.जळगाव) असे मयत प्रौढाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह रघुनाथ अस्वार यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. रविवार, 5 डिसेंबर रोजी घरात कुणीही नसतांना त्यानी घराचा दरवाजा आतून बंद करून दोरीने छताला गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास ही लक्षात लक्षात आली. शिरसोली येथील पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी घटनास्थळी धाव घेवून त्यांचा मृतदेह खाली उतरवला. जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय सोनवणे यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय सोनवणे यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत रघुनाथ अस्वार यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी आणि दोन भाऊ असा परीवार आहे.

Copy