रेल्वे स्थानकावर लवकरच होणार विवाह सोहळे !

0

मनमाड । विवाह सोहळ्याचे कार्यक्रम आज विमानात ,जहाजात,किवा एखाद्या सुंदर बोटावर होतात.त्याचबरोबर विवाह मंगल कार्यालय लग्नसोहळ्याच्या वेळी मिळत नाही त्यामुळे अनेकांना लग्नसोहळा गल्लीत किवा मैदानात उरकावे लागतात.मात्र आता रेल्वे विभागाने आपले उत्पन्न वाढावे ज्याठिकाणी कमी गर्दी किवा मालगाडी किवा खाली पडलेले फलाट आहे. अशा ठिकाणी लग्नसोहळे करण्यासाठी परवानगी द्यावी असा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे स्थानक असलेल्या मनमाड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एक महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी लग्नसोहळा आणि स्वागत सोहळ्यासाठी भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे देण्यात आला आहे.या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास कमी गर्दीच्या इतर स्थानकावरील फलाटावर हा प्रयोग राबविला जाऊ शकतो. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत कमी गर्दीची फलाटे महसुली उत्पन्नासाठी वापरता येतील काय, यासह रेल्वेला अधिक उत्पन्न मिळविण्याचे कोणकोणते स्रोत वापरता येतील यावर चर्चा झाली.