कोल्हे हिल्स परिसरात जंगलाला आग

0

जळगाव । सावखेडा शिवारातील कोल्हे टेकडी परिसरात कुंभार खोरी म्हणुन प्रसीद्ध असलेल्या झाडे झूडपांनी वेढलेल्या टेकड्यांना मंगळवारी 2.30 वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. अचानक लागलेल्या अगीने वणव्यात रुपांतरीत होवुन कोरडे गवत टकड्यावर अच्छादलेले असल्याने वार्‍याच्या वेगात हि वनसंपदा काही तासात राख झाली. फोन करुनही दिड तास उशिराने अग्निशामक दल पोचले, वनविभाग कर्मचारी होते तसेच बघ्याच्या भुमिकेत उभे राहीले होते. यानंतर उशिराने आलेल्या अग्निशमन दलाने पाण्याचा मारा केल्यानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले. या आगीमुळे कोल्हे टेकडी परिसरात धुराळा पसरला होता.

शहरापासुन लांब सावखेडा शिवार परिसरातील कोल्हेहिल्स् येथे कुंभार खोरीतील सेक्टर – 106 मध्ये दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गवताला आग लागली. डोंगराच्या कडेवर लागलेल्या आगीने केव्हा वणव्याचे रुप धारण केले कळलेही नाही. पश्‍चिमेकडून जळत येणारी आग दर्‍या डोंगर पार करीत खानबाबा दर्ग्याच्या मागे पर्यंत तीन वाजेला पोहचल्यावर आगीचे रौद्ररुप कळाले. दर्ग्यापरीसरात फिरणारे शाळकरी पोरं, काही बांधकाम मजुरांनी झाडांचे नुकसान नको म्हणुन, लिंबाच्या पाल्याच्या मोळ्या करुन आग विझवण्यास सुरवात केली. इतक्यात दर्ग्यातील भाविकांनी वन विभागाला, कुणी अग्निशामक दलास फोनवरुन माहिती दिली. मात्र वेळेवर कुणीही येवु न शकल्याने दिड-दोन तासांत एकामागुन एक डोंगर आगीच्या तावडीत सापडून झाडे-झुडपांनी पेट घेतला. पावसाळ्यात हिरवळीने नटलेल्या या टेकड्या कोरड्या गवताने सोनेरी झाल्या होत्या. मात्र आज आग लागल्या नंतर पुर्णंत: काळवंडल्या असुन उभे वृक्ष जळून खाक झाले.

आग विझविण्यास अडचणी
अतिक्रमण होऊ नये म्हणुन वनविभागाने या टेकड्यांना चारही बाजुने लांबच लांब तार कुंपण करुन घेतलेले आहेत. परिणामी अग्निबंब पोचण्यास अडचणी आल्या, एका बाजुने अग्निशामकची गाडी पोचल्यावर खाली खोलवर दरीतून वणव्याने पेट घेतला. खालून ट्रॅक्टर पाठवून देखील उंचसखल खोल खड्ड्यांमुळे ट्रॅक्टरलाही आग विझवण्यास अडचणी येत होत्या.

दोन बंब घटनास्थळी
घटनास्थळावर आग विझवत असेल्या लोकांनी वनविभागाच्या कार्यालयात एकामागुन एक फोन करुनही साडेतीन पर्यंत कोणी येण्यास तयार नव्हता, चार वाजेच्या सुमारास परिसरातील नगरसेवकपुत्राने फोन लावुन आगीची माहिती वन विभागाला दिली. नंतर अग्निशामक दलास दिल्यावर काही तरी हालचाल झाल्याचे आढळले अर्ध्यातासात अग्निशामक विभागाचे दोन बंब, नगरसेवकाचे एक ट्रॅक्टर, जैन उद्योगचा बंब टेकड्यांवर पोचला. अग्निशमनाचे बंब घटनास्थळी येईल तो पर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. तर आकाशात सर्वत धुराळा पसराला होता. यानंतर पाण्याचा मारा केल्यानंतर आगीवर नियंत्रण आणले.

मुलांची चार तास परीश्रम
डोंगर दर्‍यात पंतग उडवण्यासाठी, खेळण्यासाठी भटकत असतात. आग लागल्याची माहिती मिळताच खेळ सोडून बंच्चे कंपनीसह, तरुणांनी हातात, आग विझवण्यासाठी आगीचा वणवा अंगाकडे येत असतांना हि वानसेना आग विझवत होती, त्यात अंकुश रघूनाथ सोनवणे, बापु सोनवणे, मंगेश गांगुर्डे, धनराज पाटील, राजु सतिष सोनवणे, विशाल प्रकाश कुराडे, दिपक सुभाष पाटील, विजय बबन शिंदे, सुनील राजु सोनवणे, अविनाश अलाट यांच्यासह इतरांचा समावेश आहे. दरम्यान, हिवाळ्याच्या दिवसात अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली.