बोरगाव येथील पत्रकारास झालेल्या मारहाणीचा निषेध

0

फैजपूर । शिरपूर तालुक्यातील बोरगाव येथील पत्रकार अमोलसिंग राजपूत यांना करण्यात आलेल्या मारहाणीचा फैजपूर येथील पत्रकारांतर्फे निषेध करण्यात येवून प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले व संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पत्रकार राजपूत यांनी बोरगाव विविध कार्यकारी सोसायटीमधील गैरप्रकाराचे वृत्त प्रकाशित केल्याचा राग येवून उपसरपंच नामेसिंग राजपूत व त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली. याचा निषेध
करण्यात आला.

कठोर कारवाईची मागणी
उपविभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील यांनी निवेदन देण्यात आले असून बोरगाव येथील उपसरपंच यांना तात्काळ पदच्युत करुन त्यांच्या साथीदारांवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच पत्रकारांवर होणारे वाढते हल्ले रोखण्याकरीता राज्य शासनाने पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी अधिकाधिक कठोर करण्यात यावी, अशी मागणी नमूद करण्यात आली आहे.
याप्रसंगी पत्रकार वासुदेव सरोदे, निलेश पाटील, प्रा. उमाकांत पाटील, योगेश सोनवणे, ललित फिरके, मलक शाकीर, सलिम पिंजारी, इदू पिंजारी, राजू तडवी, समीर तडवी, फारुक शेख, संजय सराफ, नंदकिशोर अग्रवाल, मयुर मेढे, शेख कामिल, शेख मुदवसर, अरुण होले आदी उपस्थित होते.