नामदेवराव चौधरी स्मृती व्याख्यान मालेचे आयोजन

0

भुसावळ । स्वातंत्र्य सैनिक कै. नामदेवराव चौधरी वाचनालयाची दशकपुर्ती असून वाचनालयतर्फे 22, 23 व 24 जानेवारी रोजी शहरातील श्रोत्यांसाठी दर्जेदार व्याख्यानांची मालीका अहिल्यादेवी कन्या विद्यालय येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित केली आहे. वाचनालयाची ही 5 वी व्याख्यानमाला आहे. खंडीत 5 व्या व्याख्यान मालेचे पहिले पुष्प 22 जानेवारीला दैनंदिन जिवनात उपयुक्त गितेची सुत्रे’ याविषयावर विनय पत्राळे हे गुंफणार असून ते रेकी मास्टर, लेखक, मोटीव्हेटर व प्रशिक्षक आहेत.

23 ला द्वितीय पुष्प
23 ला व्दितीय पुष्प जेष्ठ विचारवंत डॉ. अशोकराव मोडक हे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय एकात्मकतेचे विचार पर्व’ याविषयावर गुंफणार आहे. मोडक यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

बदलत्या राजकीय स्थित्यंतरावर डॉ. रनाळकर करणार भाष्य
तर 24 ला अंतिम व तृतिय पुष्प डॉ. राहुल रनाळकर हे राजकारणातील बदलते नव आव्हाने या विषयावर गुंफणार आहेत. यात 8 नोव्हेंबर 2016 देशाच्या राजकारणाला दिशा देणारा दिवस. उदारीकरणानंतरचा सर्वात मोठा निर्णय यापुढील काळातील राजकारण. सत्ताधारी बलवान होत आहेत ? यावर ते संबोधन करतील. राहुल रनाळकर हे 16 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहेत. आपत्कालीन प्रसंगांमध्ये पत्रकारिता कशी करवी, यासह दहशतवाद ,राजकारण आणि पातंजल योग हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. बहुआयामी व्याख्यानाचा लाभ भुसावळकरांनी घेण्याचे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.