शहरातील 40 उमेदवारांचे झाले डिपॉझिट जप्त

0

दुरंगी लढत झाल्याने उर्वरित उमेदवारांचा पराभव

पिंपरी: पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि विधानसभा मतदारसंघातील 48 पैकी तब्बल 40 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले आहे. चारही मतदारसंघात दुरंगी लढत झाल्याने उर्वरित उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला असून त्याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. गेली अनेक दिवस प्रतिक्षेत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा अखेर आज संपली. मतदार राजाचा कौल काहींसाठी तारक तर काहींसाठी मारक ठरला. चार मतदार संघात 40 उमेदवारांना स्वत:चे ‘डिपॉझिट’ही वाचविता आले नाही. उमेदवाराला मतदार संघात प्रत्यक्षात झालेल्या एकूण मतांच्या किमान एक षष्ठांश मते मिळणे आवश्यक आहे. मात्र, पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळातील बहुतांशी उमेदवार त्यात अपयशी ठरल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले. चारही मतदारसंघातून 48 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी अवघ्या चार उमेदवारांना त्यांचे डिपॉझिट’ (अनामत रक्कम) वाचवता आले आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघातून 18 उमेदवार रिंगणात होते. याठिकाणी एक लाख 77 हजार 595 मतदान झाले.

येथील उमेदवाराला डिपॉझिट वाचविण्यासाठी किमान 29 हजार 599 मतांची आवश्यकता होती. मात्र त्यात 16 उमेदवारांना अपयश आले. त्यात वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब गायकवाड (13,681), बसपचे धनराज गायकवाड (1,213), गोविंद हेरोडे (262), संदीप कांबळे (254), बाळासाहेब ओव्हाळ (936), ऍड. मुकुंदा ओव्हाळ (296) , अजय लोंढे (287), दिपक जगताप (295), चंद्रकांत माने (212), नरेश लोट (155), हेमंत मोरे (568), युवराज दाखले (482), अजय गायकवाड (461), डॉ. राजेश नागोसे (350), दिपक ताटे (430), मीना खिलारे (305) या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

Copy