Private Advt

40 वर्षीय पेंटर व्यावसायीकाची गेंदालाल मिल भागात आत्महत्या

जळगाव : गेंदालाल मिल परीसरात राहणार्‍या 40 वर्षीय प्रौढाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुनील नारायण सोनवणे (40) असे गळफास घेतलेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

पेंटर व्यावसायीकाच्या आत्महत्येने हळहळ
सुनील सोनवणे हे पेंटरचे काम करून उदरनिर्वाह करतात. घरी आई व मुलगा यांच्यासह वास्तव्याला आहे. सोमवारी रात्री जेवण करून एफएमवर गाणे ऐकत असतांना झोपले. मध्यरात्री त्यांनी घरात सर्वजण झोपलेले असतां गळफास घेवून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी त्यांचा मुलगा मोहित हा शाळेत जाण्यासाठी उठला असता हा प्रकार लक्षात आला. सोनवणे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झालेले नाही. शेजारी राहणार्‍या नागरीकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची सुरतवाला यांनी तपासणी करीत मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.पुढील तपास ललित भदाणे तपास करीत आहेत.