हॉटेल न मिळाल्याने टीम इंडिया अद्याप पुण्यातच!

0

मुंबई : लग्नाच्या कारणामुळे टीम इंडियाला कटकमध्ये हॉटेल मिळालेले नाही. म्हणून टीम इंडिया अद्याप पुण्यातच असल्याची माहिती समोर आली आहे. इंग्लंड विरुद्ध सुरू असेलेल्या एकदिवशी मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी कटक येथे खेळला जाणार आहे. मात्र, सूत्रांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार टीम इंडिया अजूनही पुण्यातच थांबली असल्याचे सांगण्यात येत आहे. कटकमधील सामन्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे बुधवारी सकाळी ‘टीम इंडिया’ पुण्यातून कटकला रवाना होणार आहे.

पुण्यातच करावा लागला सराव
एका क्रिकेट वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडचा संघ कटकमध्ये पोहचला असून त्यांनी सरावही सुरू केला आहे. मात्र, टीम इंडिया अजून तेथे पोहचू शकलेली नाही. कारण, ज्या हॉटेलमध्ये भारतीय टीमची राहण्याची व्यवस्था केली होती. त्या हॉटेलमध्ये लग्नामुळे सर्व खोल्या बुक झाल्या आहेत. त्या खोल्या आता गुरुवारी सकाळीच रिकाम्या होणार आहेत. एका क्रिकेट वेबसाईटशी बोलताना ओडिशाच्या क्रिकेट एसोसिएशनचे सचिव आशीर्वाद बेहरा यांनी सांगितले की, हॉटेलमधील खोल्यांच्या कमतरतेमुळे टीम इंडियाला पुण्यातच राहावे लागत आहे. भारतीय संघ व्यवस्थापनच्या एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, टीम इंडिया बुधवारी सकाळी ११.३० ला कटकला पोहचेल तोपर्यंत टीमला पुण्यात सराव करावा लागणार आहे. हॉटेलमधील खोल्या रिकाम्या नसल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे संघाला पुण्यात थांबावे लागले आहे.