रेल्वे अपघातात अनोळखी इसमाचा मृत्यू

0

जळगाव । येथील आसोदा रेल्वे गेट जवळ रेल्वे खाली सापडल्याने 35 ते 40 वर्षीय वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा रेल्वेखाली सापडल्याने मृत्यू झाल्याची घटना 16 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेपूर्वी घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांचा घटनास्थळी जावून पंचनामा
आसोदा रेल्वे गेट जवळील खंबा नंबर 421,1 दरम्यान सकाळच्यासुमारास रेल्वेखाली सापडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला़ ही घटना रेल्वे क्रमांक 51154 वरील चालकाने उप स्टेशन प्रबंधक यांना कळविली. माहिती कळताच रेल्वे पोलीस व तालुका पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या घटनेसंदर्भात उप स्टेशनप्रबंधक डी.टी.तायडे यांनी दिलेल्या खबरीवरून तालुका पोलीस ठाण्यात सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ. आत्माराम पाटील हे करीत आहेत. दरम्यान मयता संदर्भात अद्याप कोणतीही माहीती मिळून आलेली नाही. पोलीस याचा शोध घेत आहेत.