सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र आल्या जुन्या मैत्रीणी

0

भडगाव । व्हॉटस् अप, फेसबुक सारख्या सोशल मिडीयामुळे जवळचे मित्र दुरावत असल्याचे आणि सोशल मिडीयाचा गैरवापर होत असल्याची ओरड नेहमीचीच असते. परंतु याला अपवाद ठरले आहे. ते भडगाव येथील मैत्रीणी 25 वर्षानंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र आले आहे. व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून या मैत्रीणी एकत्र आल्या असून ज्या शाळेत त्यांनी लहान पणात शिक्षण घेतले त्या शाळेला भेट देवून त्यांनी बालपणाच्या आढवणींना उजाळा दिला आहे. 1990 साली भडगाव येथील इंग्लिश स्कुल मध्ये 9 वीच्या वर्गात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थीनींनी सोशल मिडीयाद्वारे शाळेतील मैत्रीणींना शोधले व शाळेला भेट देण्याचे ठरविले होते. महाराष्ट्राच्या काना कोपर्‍यांतून सोनाली पवार, सूचिता पाटील, प्रिया देशमुख, मेघा पूर्णपात्रे, ललिता पाटील, मनिषा पाटील, अंजली-स्मिता पोतदार, निलीमा पाटील, ललिता पाटील, वैशाली झांबरे आदी मैत्रीणी एकत्र आल्या व त्यांनी यावेळी बालपणात केलेल्या थट्टा मस्करीचा मनसोक्त आनंद लुटला.

25 वर्षानंतर दिला जुन्या स्मृतींना उजाळा
मुलींना आपल्या माहेरनंतर जर सर्वांत प्रिय असेल तर ती आपली शाळा कारण या ठिकाणी केलेली थट्टा-मस्करी, मौज-मजा, रूसवे-फुगवे, राग-लोभ, जय-पराजय, मान-अपमान सर्व काही भावी जीवनाची शिदोरी बनत असते. 25 वर्षानंतर एकत्र आल्याने सर्व शाळेच्या प्रांगणात नटून-थटून हजर झाल्या. माजी विद्यार्थींनीनी विद्यमान विद्यार्थ्यांसमावेत प्रार्थना म्हटली. यानंतर या सर्वं मैत्रणींनी कधीकाळी ज्या शाळेच्या खोलीत बसून आपण ज्ञान संपादन केले, त्यावर्गखोलीला भेट देवून, आपल्या गुरूजनांना नमन करून कृतज्ञता व्यक्त केली. परिसरातील झाडांना 25 वर्षांनंतर भेट देवून आपल्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला. शिक्षकांनी सर्व माजी विद्यार्थिंनीचे मनःपूर्वक स्वागत केले. त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. शाळेतर्फे खणानारळाची ओटी भरून या सर्व विद्यार्थिंनींना भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.