वधु-वर मेळाव्यात आठशे तरुणांनी दिला परिचय

0

जळगाव । महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हाद्वारे सोनार समाजातील सर्व पोटशाखीय विवाह इच्छुक तरुणांसाठी राज्यस्तरीय ऋणानुबंध वधू-वर व पालक परिचय मेळावा 2017 चे कै.विठ्ठल गणपतशेठ निकुंभ (अमळनेरकर) नगर नूतन मराठा महाविद्यालयात आयोजन करण्यात आले. मेळाव्यातून 815 तरुणांनी परिचय करुन दिला. यात सहाशे तरुण आणि 215 तरुणींचा सहभाग होता. गुजरात, मध्यप्रदेश येथील तरुणांनी मेळाव्यात सहभाग नोंदविला.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विजय वानखेडे
उपवर वधू-वरांसोबतच त्यांच्या पालकांनी देखील परिचय करुन दिला. समाजातील व्यक्तींनी केलेल्या सहकार्यातून भोजन व्यवस्था करण्यात आली करण्यात आली होती. मेळाव्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नव्हते. साहित्यीक वि.दा.पिंगळे यांनी उपवर वधू-वरांना मार्गदर्शन केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विजय वानखेडे हे होते. मेळाव्याचे प्रास्ताविक महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे अध्यक्ष संजय विसपूते यांनी केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी आमदार अ‍ॅड.जयप्रकाश बाविस्कर, नगरसेवक नरेद्र पाटील, रामदास निकुंभ, विलास बाविस्कर, संजय जाधव आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अरुण वडनेरे, संजय पगार, इच्छाराम दाभाडे, सुरशे सोनार, उत्तमराव नेरकर, धनराज जाधव, नितीन गंगापूरकर, भगवान दुसाने, दिपक जाधव, शशिकांत जाधव, सुभाष सोनार, सुधारकर सोनार आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन रतन थोरात, केतन सोनार यांनी तर आभार राजेंद्र विसपूते यांनी केले.