0

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवानांच्या व्हिडिओमुळे दसात खळबख माजली असतानाच आता लष्कराच्या एका जवानाचा व्हिडिओ समोर आला आहे. अधिकार्‍यांकडून होत असलेल्या शोषणाची व्यथा आपण पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे व्यक्त केली होती. त्यामुळे आपले कोर्ट मार्शल होऊ शकते, असे या या जवानाने म्हटले आहे.

डेहराडूनमध्ये तैनात असलेले 42 इन्फंन्ट्री ब्रिगेडचे लान्स नायक यज्ञप्रताप सिंह यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. लष्करी अधिकार्‍यांकडून होत असलेल्या शोषणाची माहिती 15 जूनला राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना एका पत्राद्वारे दिल्याची माहिती यज्ञ प्रताप सिंह यांनी यात दिली आहे. जेव्हा ही बाब लष्कराच्या अधिकार्‍यांना समजली तेव्हा त्यांना याबद्दल सुनावण्यात आले होते. आता यावरुन आपले कोर्ट मार्शल केले जाऊ शकते, असे यज्ञ प्रताप सिंह यांना वाटते आहे.

लष्करात अनेक ठिकाणी जवानांना कपडे धुण्यास, बूट पॉलिश करण्यास, कुत्र्यांना फिरवण्यास सांगितले जाते. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावे, असी विनंती यज्ञ प्रताप सिंह यांनी केली आहे. आपण काहीही चुकीचे केलेले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
यज्ञ प्रताप सिंह यांच्या आरोपांकडे लष्कराने गांभिर्याने लक्ष दिले आहे. जवानांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एखाद्या जवानाला वैयक्तिक त्रास होऊ शकतो. अशा तक्रारींसाठी लष्करात व्यवस्था तयार करण्यात आली आहे. संबंधित जवान तेथे आपली तक्रार नोंदवू शकतो. जवानाने तक्रार नोंदवल्यास योग्य कारवाई केली जाऊ शकते,’ असे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.