जळगाव येथे रविवारी गो डिजिटल सेमिनार

0

जळगाव । उद्योग, व्यापार, व्यवसाय आणि सेवा अशा सर्वच क्षेत्रात डिजिटल साधने, उपकरणे आणि माध्यमांचा वापर वाढतो आहे. संगणकापासून तर मोबाईलमध्येही डिजिटल तंत्राचाच वापर असतो. कोणत्याही प्रकारचे डिजिटल तंत्र व्यक्तिगत व सामुहिक पातळीवर कशा प्रकारे उपयोगाचे, उपयुक्त आणि आपल्या कार्यासाठी फायद्याचे ठरते हे जाणून घेणे आवश्यक झाले आहे. याच हेतूने रविवार, दि. 15 जानेवारीला जळगाव येथे गो डिजिटल सेमिनार आयोजित केला आहे.

हा सेमिनार जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या पद्मश्री डॉ. भरवलाल जैन सभागृहात सकाळी 10.30 ते 12 दरम्यान होणार आहे. जळगाव येथील टेकवार्ताचे संपादक शेखर पाटील, क्रिएटीव्ह कम्प्युटर्सचे संचालक गोकुळ चौधरी व सोशल मीडिया सोल्युशनचे संचालक दिलीप तिवारी यांनी या सेमिनारचे आयोजन केले आहे.

प्रथम 100 जणांना मिळणार प्रवेश
या सेमिनारमध्ये सहभागाचे शुल्क एका व्यक्तिसाठी 150 रुपये आहे. पहिल्यांदा नावनोंदणी करणार्‍या 100 जणांनाच यात सहभागी होता येणार आहे. सहभागासाठी नाव नोंदणी करायची असेल तर मोबाईल क्रमांक 9421545417 वर संपर्क साधावा. या सेमिनारमध्ये इंटरनेट, त्याच्याशी संबंधित प्रणाली आणि डिजिटल टूल्स या विषयी शेखर पाटील हे माहिती देतील. डिजिटल टूल्सचा वापर आपल्या व्यवसाय, उद्योग, उत्पादन, सेवा आदीच्या प्रचार, प्रसार आणि विस्तारासाठी कसा करता येईल या विषयी गोकुळ चौधरी हे माहिती देतील. डिजिटल माध्यमांसाठी आशय कसा निर्माण करावा या विषयी दिलीप तिवारी हे माहिती देतील. या सेमिनारमध्ये उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार यांच्यासह डॉक्टर, वकिल, शिक्षक, विद्यार्थी आदींनी सहभागी होणे अपेक्षीत आहे.