35 लाखांच्या नोटा जप्त

0

पनवेल : नवी मुंबईच्या खांदेश्वरमध्ये पोलिसांनी 35 लाखांच्या नव्या नोटा आणि 2 किलोची सोन्याची बिस्किटे ताब्यात घेतली आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा या नव्या 2000 च्या आहेत. तसेच जप्त करण्यात आलेले 2 किलो 50 ग्राम सोने नेमके कुणाचे आहे याची चौकशी पोलिसांनी सुरु केली होती. याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले आहे. या सहा जणांपैकी चौघेजण हे पुण्यातील आहेत तर दोनजण ऐरोली आणि वाशीतील आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेले 6 जण नोटा बदलण्यासाठी आले होते का? तसेच कोणत्या व्यापार्‍याला सोने देण्यास आले होते याचा तपास पोलिस करत आहेत.