33 हेक्टर जागा ‘नो डेव्हलपमेंट झोन’मधून वगळली

0

मुंबई । आरे कॉलनीतील जाग मेट्रो कारशेडसाठी देण्यास शिवसेना विरोध होता. या विरोधाल न जुमानता मेट्रो 3 प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील 33 हेक्टर जागा ही मेट्रो कारशेडसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. मेट्रो कारशेड आरेतच होणार हे नक्की झालं आहे.मुंबई मेट्रो-3 साठी आवश्यक जागा त्वरित हस्तांतरीत करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यानंतर आता कारशेडच्या आरेतील जागेला मंजुरी दिल्याने, शिवसेनेला दुहेरी धक्का दिला आहे.मुख्यमंत्र्यांनी आरे परिसरातील 33 हेक्टर जागा ‘नो डेव्हलपमेंट झोन’मधून वगळला आहे. तसंच इथेच मेट्रो कारशेडच्या जागेला मंजुरी दिली आहे.

कुलाबा-वांद्रे-सिप्झ असा 33 किलोमीटरचा हा मुंबईतला पहिलाच भुयारी मेट्रो प्रकल्प आहे. मात्र, या प्रकल्पामुळे गिरगाव, दादर भागातील लोक विस्थापित होतील आणि कारशेडमुळे आरे कॉलनीतल्या झाडांची हानी होईल असा दावा शिवसेनेचा आहे. 2019 पर्यंत ही मेट्रो सुरु करण्याचा भाजपचा मानस आहे. मेट्रोसाठी 17 भूखंड तात्पुरत्या स्वरूपात, तर 24 भूखंड कायम स्वरूपात मेट्रो कार्पोरेशनला हस्तांतरीत करावेत असे आदेशच नगरविकास विभागाने यापूर्वीच महापालिकेस दिले.

केंद्राचाही हिरवा कंदील
यापूर्वी बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कची 165 हेक्टर जमीन इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्याला केंद्रानं हिरवा कंदील दाखवला आहे. राज्याच्या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.
केंद्राच्या या होकारानंतर मेट्रो-3 चं कारशेड आरे कॉलनीत उभारण्याच्या दृष्टीनं पावलं पडताना दिसत आहेत. कुलाबा ते अंधेरी (सीप्झ) मार्गावर धावणार्‍या मेट्रो 3 च्या कारशेडसाठी ही धडपड सुरु आहे.