31 हजार धरणे गाळमुक्त होणार

0

मुंबई । राज्यात जलसाठ्यांच्या साठवणक्षमतेत वाढ करण्यासाठी गाळ काढून तो शेतामध्ये वापरण्यासाठी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. लघु पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, गावतलाव, पाझर तलाव आणि विदर्भातील माजी मालगुजारी तलावांमधील गाळाचा साठवणक्षमतेवर होणारा परिणाम लक्षात घेता अडीचशे हेक्टरपेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या आणि 5 वर्षांपेक्षा जुन्या धरणांमधील गाळ काढण्याची मोहीम राबविली जाणार आहे.

8 लाख 68 हजार हेक्टर्स क्षमता
स्थानिक शेतकर्‍यांना मोफत गाळ मिळणार असून तो स्वखर्चाने शेतामध्ये वाहून न्यावा लागणार आहे. गाळाचे स्वामित्व शुल्क माफ करण्यात आले आहे. गाळ उपसण्यासाठी यंत्रसामग्री व इंधनखर्च शासनाकडून व सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध निधीतून करण्यात येईल. गाळ काढण्यात येणार्‍या धरणांची साठवण क्षमता 42.54 लक्ष स.घ.मी. इतकी असून सिंचन क्षमता 8 लाख 68 हजार हेक्टर इतकी आहे. पुढील चार वर्षात टप्प्याटप्प्याने संपूर्ण गाळ काढण्यात येणार आहे.