30 हजार सभासदांची नोंदणीचा निर्धार : अ‍ॅड.रोहिणी खडसे

मुक्ताईनगर : राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 30 हजार सभासद नोंदणी करण्याचा निर्धार राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या तेराव्या दिवशी अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी रावेर तालुक्यातील तापी काठावर असणार्‍या भिल्ल वस्ती लूमखेडा, लूमखेडा, रणगाव, तासखेडा, गहूखेडा, सूदगाव, रायपुर या गावांमध्ये ग्रामस्थांसमवेत संवाद साधताना व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले की, अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद असून कोणतेही संविधानिक पद नसताना त्या जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी गावोगावी जात आहेत. यावेळी राजेश वानखेडे, रमेश पाटील, नीळकंठ चौधरी, यु.डी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रावेर तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.