3 हजार 210 जागांसाठी 17 हजार 331 उमेदवार

0

मुंबई । राज्यातील 10 महानगरपालिका आणि दुसर्‍या टप्प्यातील 11 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 118 पंचायत समित्यांसाठी (ता.21) मतदान होत असून, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण 3 हजार 210 जागांसाठी 17 हजार 331 उमेदवारांमध्ये लढत होत आहे.

त्यासाठी 3 कोटी 77 लाख 60 हजार 812 मतदारांकरिता 43 हजार 160 मतदान केंद्रांची तसेच 68 हजार 943 कंट्रोल युनिट व 1 लाख 22 हजार 431 बॅलेट युनिटसह यंत्रांची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर 2 लाख 73 हजार 859 कर्मचार्‍यांसह आवश्यक तेवढा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.