3 जूनला महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

3

मुंबई: यंदाच्या वर्षात समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. दरम्यान आता पावसाची चाहूल लागली असून अरबी समुद्रात निर्माण झालेला हवेचा कमी दाबाचा पट्टा येत्या बारा तासांमध्ये अधिक तीव्र होऊन त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. चक्रीवादळ तयार झाल्यानंतर त्याची गती आणि दिशा ही उत्तर दिशेला असेल त्यामुळे ३ जून रोजी हे चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनारी भागात सरकेल. यामुळे मुंबई, ठाण्यासह पश्चिम किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाने आज सोमवारी व्यक्त केली.

चक्रीवादळ जेव्हा उत्तरेकडे सरकेल तेव्हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल. ३ जून पासून ते जेव्हा उत्तर कोकणाच्या जवळ असेल तेव्हा ठाणे, मुंबई, रायगड आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

३ जूनच्या संध्याकाळी किंवा रात्री दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. मुंबईशिवाय ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ या भागांचा समावेश होतो.

Copy