296 शेतकर्‍यांच्या कापूस खरेदीला शासनाकडून ब्रेक

0

रावेर : सीसीआयतर्फे रावेर येथील शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांच्या कापसाची बुधवारपासून पुन्हा शासनाने खरेदी थांबविली आहे. रावेर कापूस खरेदी केंद्रावर नाव नोंदणी केलेल्या रावेर व यावल तालुक्यातील 296 शेतकर्‍यांच्या कापसाची खरेदी पुन्हा थांबली आहे रावेर तालुक्यातील कापूस विक्रीसाठी नाव नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांच्या 10 जानेवारीपर्यंत तीन हजार 200 क्विंटल कापसाची खरेदी झाल्यावर सीसीआयने ही खरेदी बंद केली होती. 20 मे रोजी ही खरेदी सुरू करण्यात आली. त्यानंतर चार दिवस कापसाची खरेदी केल्यावर पुन्हा 3 जूनपासून खरेदी बंद करण्यात आली. या चार दिवसांत एक हजार 779 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. रावेर तालुक्यातील 246 व यावल येथील 129 शेतकर्‍यांनी नाव नोंदणी केलेल्या एकूण 375 शेतकर्‍यांपैकी 79 शेतकर्‍यांच्या कापसाची खरेदी करण्यात आली आहे तर 296 शेतकर्‍यांची कापूस खरेदी रखडली आहे.

Copy