26 सप्टेंबरचे आक्रोश आंदोलनाचा लढा यशस्वी होणार

0

अ‍ॅड.गणेश सोनवणे : यावलला कोळी समाजबांधवांची बैठक

यावल- तालुक्यातील आदिवासी कोळी समाजबांधवाच्या सहकार्याने मी उभारलेला लढा यशस्वी होत असून 26 सप्टेंबर रोजी होणारे आक्रोश आंदोलन यशस्वी करण्यासाठी हजारोंच्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन अ‍ॅड.गणेश सोनवणे यांनी आदिवासी कोळी समाज बांधवांना केले. यावल येथील शेतकी संघाच्या कार्यालयात समाजबांधवांची बैठक जिल्हा परीषद टनेते प्रभाकर सोनवणे यांचा अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी अ‍ॅड.गणेश सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.

जैनाबादपासून आंदोलन
अ‍ॅड.सोनवणे म्हणाले की, समाजातील शेतमजूर गोरगरीब लोकांचे प्रश्‍न जात प्रमाणपत्र अभावी रखडत असल्यामुळे मी पक्ष विहरीत मोर्चाचे नियोजन केले आहे. जळगावातील जैनाबाद येथील वाल्मीक पुतळ्यापासून आंदोलनाला सुरुवात होईल. पाडळसा ग्रामपंचायत सदस्य खेमचंद कोळी यांनी शासन कोणत्याही पक्षाचे असो आपल्या समाजाच्या प्रश्‍न सुटत नसल्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. समाजातील सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गणेश सोनवणे यांनी आवाहन करीत हजारोंच्या संख्येने उपस्थितीचे आवाहन केले. भाजप सरकारने दिलेले आश्वासन पुर्ण केले नाही तर मी समाजासाठी पक्ष त्याग करून तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी यावल येथील शरद कोळी, दशरथ सपकाळे, बबलू कोळी, विठ्ठल सुर्यवंशी, आत्माराम सपकाळे, समाधान सोनवणे, कौती कोळी, गोकुळ तायडे, अनिल कोळी, किरण कोळी, अमर कोळी, बापू कोळी, आकाश कोळी, गोकुळ कोळी, गणेश कोळी, धोंडू सोळंके, राघो सोळंके, प्रताप सोनवणेंसह समाजबांधव उपस्थित होते. प्रभाकर सोनवणे म्हणाले की, समाजबांधवांच्या समस्यां सोडविण्यासाठी केव्हाही तयार आहे. आपसातील मतभेद दूर करून आक्रोश मोर्चा यशस्वी करण्यासाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्तविक प्रमोद कोळी यांनी केले तर आभार भरत कोळी यांनी मानले.