25 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या

0
पिंपरी : महाराष्ट्र पोलीस दलात नव्याने भरती झालेल्या 25 पोलीस उपनिरीक्षकांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात नियुक्त करण्यात आले आहे. हे सर्व पोलीस उपनिरीक्षक शुक्रवार (दि. 23 नोव्हेंबर) रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात हजर झाले आहेत. या पोलीस उपनिरीक्षकांना प्रशिक्षणासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात नियुक्त झाले आहेत. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी नुकतेच काढले. पिंपरी, चिंचवड, निगडी, चिखली आणि देहूरोड पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी एक तर अन्य दहा पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली.
Copy