मामाला डोक्याला मारहाण करणार्‍या भाच्याला शिक्षा

0

अमळनेर । भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मामाच्या डोक्यात लाकडाने वार करून खून केल्याप्रकरणी आरोपी भाच्यास अमळनेर न्यायालयाने 10 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा न्या.डी.इ.कोठलीकर यांनी 2 मे रोजी सुनावली आहे. 20 ऑगस्ट 2015 रोजी आरोपी रोहिदास युवराज भिल (रा. वडजी ता. चोपडा) येथे विताभट्टी थापणारे मामा शांताराम भगवान भिल यांच्याकडे आला असता रात्री आरोपी व त्याची आई अंगणात बसलेले असतांना आरोपी दारू पिऊन आईस मारहाण करीत होता. त्यावेळी आरोपीचा मामा व फिर्यादी शांताराम भिल बहिणीस सोडविण्यास गेला असता आरोपी रोहिदास भिल याने मामाच्या डोक्यात लाकडी झिलपीने वार करून मामा जागीच बेशुद्ध पडला व फिर्यादिसही हातापायावर मारहाण करुन फिर्यादीसही जखमी केल्याप्रकरणी भाच्यास 10 वर्ष सक्त मजुरी व 5 हजार रुपये दंड तसेच फिर्यादीच्या गाडीची तोडफोड केल्याने 1 वर्ष कैद व 3 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.