Private Advt

जळगावात दुचाकी चोरीचे सत्र कायम : वेगवेगळ्या भागातून दोन दुचाकी लंपास

जळगाव : शहरातील पोलिस यंत्रणेच्या नाकावर टिच्चून शहरात दुचाकी चोरट्यांनी डेरा जमवला असून दररोज होणार्‍या दुचाकी चोरीमुळे वाहनधारक कमालीचे धास्तावले आहेत. शहरातील गोलाणी मार्केटसह मेहरुण परीसरातून दुचाकी लांबवण्यात आल्याची बाब उघडकीकस आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोलाणी मार्केटमधून दुचाकी चोरीला
अजय देवकरण सोनवणे (29) हा तरूण खाजगी नोकरी करतो. सोमवार, 23 मे रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अजय सोनवणे याने आपली दुचाकी (एम.एच.19 डी.वाय.8996) गोलाणी मार्केट भागात पार्क केली मात्र चोरट्यांनी संधी साधून 45 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. बुधवारी जळगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक योगेश पाटील करीत आहे.

मेहरुण भागातून दुचाकी लांबविली
जळगाव शरातील मेहरूण परीसरातून अहमदखान नसीरखान मुल्ताणी (41, रा.गणेशपुरी मेहरुण, जळगाव) यांची दुचाकी (एम.एच.19 डी.ए.6396) सोमवार, 8 मे रोजी रात्री 9.30 वाजता घरासमोरील गेटजवळ पार्क करून लावली होती मात्र अज्ञात चोरट्यांनी हॅण्डलचे लॉक तोडून 35 हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. बुधवारी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे.