Private Advt

साकळी जवळ दुचाकी घसरल्याने दाम्पत्य गंभीर

यावल : तालुक्यातील नायगाव येथील वृद्ध दाम्पत्य दुचाकीद्वारे भुसावळकडे जात असताना साकळी गावाजवळ त्यांची दुचाकी घसरल्याने दाम्पत्य गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव हलविण्यात आले.

अचानक घसरली दुचाकी
नायगाव, ता.यावल येथील माधवराव फकिरा पवार (70) व इंदुबाई माधव पवार (68) हे वृध्द दाम्पत्य दुचाकीद्वारे सोमवारी दुपारी तीन वाजता नायगाव येथून भुसावळ जाण्यासाठी निघाले असता अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर साकळी गावाच्या जवळ दुचाकी घसरून अपघात घडला यात पती-पत्नी दोघंही गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयांमत वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, डॉ.अमीन तडवी, अधिपरीचारिका मंजुषा कोळेकर, संजय जेधे आदींनी प्रथमोपचार केले. दोघांना अधिक उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.