Private Advt

वाहनाच्या धडकेत वृध्द जखमी : एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव : जळगाव शहरातील आर.एल.चौफुली परीसरात तोलकाट्यासमोर वृध्दाला वाहनाने धडक देवून जखमी केल्याप्रकरणी गुरुवार, 19 मे रोजी एमआयडीसी पोलिसात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात वाहनाने दिली धडक
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी दत्तात्रय निंबाजी न्हावी (61) हे 15 मे रोजी सायंकाळी पायी जळगाव शहरातील आर.एल.चौफुली परीसरात गेले असता पायी चालत असतांना जळगाव तोलकाट्यासमोर अज्ञात वाहनाने दत्तात्रय न्हावी यांना धडक दिली मात्र वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. या अपघातात दत्तात्रय न्हावी यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी गुरुवारी जखमी दत्तात्रय न्हावी यांचा मुलगा दीपक चौधरी याने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात धडक देणार्‍या अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहेत.