केतकी चितळेचा पोलिस कोठडीत मुक्काम वाढला : या गुन्ह्यात पोलिसांनी केली अटक

मुंबई : वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत आलेल्या केतकी चितळेच्या अडचणी थांबायला तयार नाहीत. राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अटकेत असलेल्या केतकी चितळेला रबाळे पोलिसांनी गुरुवारी अटक केली असून ठाणे विशेष अट्रॉसिटी कोर्टाने केतकीला 24 मे पर्यंत तिला कोठडी सुनावली आहे.

अ‍ॅट्रासिटीच्या गुन्ह्यात केली अटक
शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अटक केल्यानंतर केतकीला ठाणे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यामुळे बुधवारची रात्र ठाणे मध्यवर्ती कारागृहात काढल्यानंतर गुरुवारी तिचा गोरेगाव पोललिस ताबा घेण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वीच रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ट्रॉसिटीच्या गुन्ह्यात नवी मुंबई पोलिसांनी तिला अटक करताच विशेष अट्रॉसिटी कोर्टात हजर केले असता न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी गुन्हा
अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींबद्दल सोशल मीडियावर केतकीने आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. याप्रकरणी अ‍ॅड.स्वप्नील जगताप यांनी तक्रार केल्यानंतर 2020 मध्ये रबाळे पोलिस ठाण्यात केतकी व सूरज शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यामध्ये अटक टाळण्यासाठी तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु सप्टेंबर 2021 मध्ये न्यायालयाने तो फेटाळूनदेखील मागील आठ महिन्यांपासून तिला अटक केली नव्हती. या गुन्ह्यात सूरज शिंदे याचा शोध न लागल्याने पोलिसांनी त्याला फरार घोषित केलेले आहे. केतकीवर नेरुळमध्येही शरद पवारांवरील टीकेप्रकरणी गुन्हा दाखल आहे.