Private Advt

सत्रासेनजवळून उमर्टीच्या तरुणाला गावठी कट्ट्यासह पकडले

नाशिक आयजींच्या पथकासह चोपडा ग्रामीण पोलिसांची कामगिरी

चोपडा : विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकासह चोपडा ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत गावठी कट्टा व जिवंत काडतूस घेवून आलेल्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या. राजपालसिंग ज्योतसिंग बडोले (20, रा. उमर्टी, ता.वरला, जि.बडवानी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुरुवार, 19 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सत्रासेन गावाजवळील तीन हात नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गावठी कट्ट्याचे उमर्टी कनेक्शन
चोपडा तालुक्यातील मध्यप्रदेशच्या सिमेला लागू असणार्‍या परीसरात गावठी कट्टयांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते शिवाय दूरवरून गुन्हेगारी क्षेत्राशी निगडीत लोक गावठी कट्टा व जिवंत काडतूसांची खरेदी करण्यासाठी या भागात येतात. पोलिस प्रशासनाकडून वारंवार कारवाई होत असली तरी शस्त्र तस्करी विविध क्लुप्त्या काढत शस्त्राची खरेदी करीत असल्याचे चित्र या परीसरातून दिसून येते.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई विशेष पथकातील वरीष्ठ पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम, सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव, एएसआय बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे, नाईक मनोज दुसाणे, शकील शेख, प्रमोद मंडलिक, चोपडा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक देविदास कुनगर, हवालदार सिंगाणे, प्रमोद पारधी, राकेश पाटील आदींच्या पथकाने केली.